आरे च्या जंगलात प्राणिसंग्रहालय उभारण्यास आम्हा मुंबईकारांचा विरोधात

तुम्ही कधी समुद्रामध्ये मत्स्यालय बनवताना पाहिलंय का कोणाला? हो, तसच काहीसं मुंबईत होणार आहे.

मुंबई शहरात चालू असलेल्याविकासकामांशी तीळमात्र संबंध नसलेल्या गोरेगावच्या आरे जंगलातील वन्यजीवांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. “जंगलाचा ही विस्तार झाला माझ्या घरा भोवती पिंजरा आला“, असं म्हणायची परिस्थिती त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली आहे.

दिनांक जून१९ रोजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यात आरे जंगलामध्ये चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणिसंग्रहालय बनवण्यासाठीसामंजस्यकरार झाला!!

 हे जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस संपूर्ण आरे जंगल नेस्तनाभूत होणार ह्यात काही शंकाच नाही. आणि उरेल, ते फक्तं शहरी माणसांच्या मनोरंजनाचं, विरंगुळाचं साधन

 निवड तुमची. फोन तुमच्या हातात आहे.



तुम्ही कधी समुद्रामध्ये मत्स्यालय बनवताना पाहिलंय का कोणाला? हो, तसच काहीसं मुंबईत होणार आहे.

मुंबई शहरात चालू असलेल्या ‘विकास’ कामांशी तीळमात्र संबंध नसलेल्या गोरेगावच्या आरे जंगलातील वन्यजीवांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. “जंगलाचा ही विस्तार झाला माझ्या घरा भोवती पिंजरा आला”, असं म्हणायची परिस्थिती त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली आहे.

दिनांक ५ जून’१९ रोजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यात आरे जंगलामध्ये चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणिसंग्रहालय बनवण्यासाठी ‘सामंजस्य’ करार झाला!!

फॅक्ट्स कडे वळूया:

१. ह्या कररा अंतर्गत आरे जंगलातील १०० एकर जंगल हे महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिकेला ‘देण्यात’ आलं. 15 ऑगस्ट’19 ला ही जागा 100 हुन 240 एकर म्हणजे दुप्पटहुन अधिक वाढवण्यात आली.

२. नैसर्गिक जंगल असलेलं हे एकमेव शहर म्हणजे मुंबई. आणि ह्या मुंबईची फुफ्फुसे म्हणजे आरेचं जंगल.

३. आरे जंगलात अनेक जातीचे पशु-पक्षी सुखाने राहतात. प्रमुख्याने ९ बिबटे, १६ अन्य जातीचे पशु, ७६ जातींचे पक्षी, ८० जातींचे फुलपाखरू, आणि ३८ जातींचे सर्प इथे निवास करतात.

४. आरे जंगल हा एक इकोसेंसिटीव्ह झोन आहे. मिठी नदीचं पूरप्रवण क्षेत्र/पूरभूमी म्हणजेच आरेचं जंगल.

५. आरे जंगल हे महाराष्ट्राचे मूळनिवासी, वारली आदिवासी, ह्यांचं निवासस्थान देखील आहे. आरे जंगलातील एकूण २७ आदिवासी पाड्यांपैकी ७ आदिवासी पाड्यांची शेत जमीन ह्या देऊ घातलेल्या 240 एकर जंगलात आहे. त्यांचा रोजगार, पोटापाण्याची व्यवस्था, त्यांची एकूणच जीवनशैली आणि प्रामुख्याने त्यांचं आराध्य दैवत, म्हणजे हेच, आरेचं जंगल आणि तिथला वाघोबा.

स्वाभाविक निष्कर्ष:

१. मुळात सामंजस्य करार करायचाच होता तर तो शासन-पालिका आणि आरेतील मुळनिवासी आदिवासी व तिथल्या वन्यजीवांमध्ये झाला पाहिजे होता.

२. जे प्राणी, पक्षी आपल्या नैसर्गिक वातावरणात, जंगलात, सुखाने राहत आहेत त्यांना, प्रजनन अभ्यासाच्या(जो नैसर्गिक रित्या जंगलात सुद्धा होऊ शकतो) आणि संवर्धनाच्या नावाखाली प्राणिसंग्रहालयाच्या जाळ्यात का अडकवावं??

३. इकोसेंसिटीव्ह झोन हा जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जाहीर केला जातो. आरेचं जंगल जर का आशा प्रकारे तोडण्यात आलं, तिथे काँक्रीटीकरण झालं, तर मिठी नदीला, आणि परिणामी मुंबई शहरात पूर आल्याशिवाय राहणार नाही. ज्याची प्रचिती आपल्याला कित्त्येक वेळेला आलेली आहेच. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचं ‘डेव्हलपमेंट’ का??

४. बरं, ह्या 240 एकर जंगलामध्ये फक्तं प्राणिसंग्रहालय बांधणार का? आपण पाहिलंय की मेट्रो ३ कारशेड(ज्यासाठी ३३ एकर जागा जवळ जवळ ह्यांच्या खिशात गेलीच आहे) च्या सोबतीने मेट्रो भवन, आर.टी.ओ. कार्यालय, हॉटेल्स, जीम वगैरे ज्या प्रकारे घुसवण्यात येणार आहेत तसच काहीसं इथे होऊ शकतं. किंबहुना, तसा प्लॅन आहेच असं गृहीत धरू.

५. अतिशय संपन्न अशी वृक्ष संपदा आणि जैववैविध्य असलेल्या या जंगलात माणसांचे लोंढे आणले जातील. ते लोंढे आणण्यासाठी मग नवीन रस्ते, गाड्या, घोंगात, प्लास्टिक, कचरा वगैरे आलंच. ह्या सगळ्यात जंगलाची खरी ओळख म्हणजे तिथली स्वच्छता आणि शांतता ही हरपलीच म्हणून समजा.

६. पर्यायी वृक्षारोपण करत असताना तुमच्या हे लक्षात येतंय का, की झाड संपूर्णपाने मोठं होईपर्यंत २०-३० वर्ष लागतात. आणि महाराष्ट्रभर दुष्काळी वातावरण असताना ह्या लाखो नवीन रोपांसाठी करोडो लिटर पाणी आणणार कुठून???

२७ पड्यांमधल्या आदिवासीयांचं ज्या प्रकारे पुनर्वसन करून त्यांना एस.आर.ए. मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होतोय तसाच काहीसा आरे मधल्या प्राण्यांचा सुद्धा होत असल्याचे चिन्हं दिसतायत. मग ह्याला प्राणिसंग्रहालय म्हणायचं का प्राण्यांचं एस.आर.ए.??

हे जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस संपूर्ण आरे जंगल नेस्तनाभूत होणार ह्यात काही शंकाच नाही. आणि उरेल, ते फक्तं शहरी माणसांच्या मनोरंजनाचं, विरंगुळाचं साधन.

तर, या अपल्या आरे च्या जंगलाला लवकरात लवलर अभयारण्य म्हणून घोषित करावे जेणे करून इथे जंगल तोड व अतिक्रमणला पूर्णतः आळा बसेल.


हे पत्र पाठवणे अतिअवश्यक होते पण या पुढे गरज पडल्यास आपण मुंबईकरांनी आपल्या आरेच्या जंगलात प्राणिसंग्रहालय किव्वा कोणता ही नवा प्रोजेक्ट न येण्यासाठी रस्त्यावर येण्याची ही तय्यारी ठेवावी.

Having Troubles Sending The Petition? Try This

For updates follow: https://www.facebook.com/AareyConservationGrp/




Share This Petition